Food Poisoning in Pune School: अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील शाळेतील घटना

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांचे डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत.

Food Poisoning | Representative Image (Photo Credit: Pix4free)

Food Poisoning in Pune School: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील डीवाय पाटील शाळेतील 28 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या 28 पैकी काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. प्रभावित विद्यार्थी प्रामुख्याने इयत्ता 1 ते 4 थीच्या वर्गातील आहेत. माहितीनुसार, शाळेने 350 विद्यार्थ्यांसाठी नाश्त्यासाठी सँडविच तयार केले होते. सँडविच खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले. अनेकांनी मळमळ, चक्कर येणे आणि पोटदुखी यांसारख्या लक्षणांची नोंद केली.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांचे डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनत्यांनी दिले. (हेही वाचा: Cyber Frauds in Pune: पुण्यात अवघ्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीत 163 कोटींची लूट; 8 प्रकरणांमध्ये 15 अटक, केवळ 91.34 लाख रुपये वसूल)

अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now