Floyd Mayweather Visits Siddhi Vinayak Temple: बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियरने घेतले मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन (Video)

माजी बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियर (Floyd Mayweather Jr) सध्या भारतात आहे. नुकतेच त्याने आणि त्याच्या टीमने मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.

Siddhivinayak Temple | X

Floyd Mayweather Visits Siddhi Vinayak Temple: माजी बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियर (Floyd Mayweather Jr) सध्या भारतात आहे. नुकतेच त्याने आणि त्याच्या टीमने मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. या ठिकाणी अमेरिकन बॉक्सिंग दिग्गजाने गणपतीचे आशीर्वाद घेतले. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मेवेदरने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अपराजित विक्रमाची नोंद केली आहे. त्याने 15 मोठ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. अनेक अहवालांनुसार, मेवेदर जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत बॉक्सर समजला जातो. (हेही वाचा: Video: टीम डेव्हिडने होम मिनिस्टर बनून वाटल्या पैठण्या, मुंबई इंडियन्सच्या 'त्या' व्हिडीओवर आदेश बांदेकरांची भन्नाट प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now