'कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर, उद्या Sangli आणि Kolhapur ला देणार भेट'- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे

Ajit Pawar | (File Photo)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आज ते मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलले. आज ते साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत व उद्या सांगली आणि कोल्हापूरला जातील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्य अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार सर्व बाधित लोकांसोबत आहे. बचावकार्य सुरू आहे. आम्ही काम करण्यासाठी सर्व एजन्सीजची मदत घेत आहोत. सहा बाधित जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पाऊस थांबला आहे मात्र हळूहळू ओसरत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement