Bhushi Dam Overflow: मोठी बातमी! भुशी धरणामागील धबधब्यात पाच मुले वाहून गेले; शोधकार्य सुरु (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, भुशी धरणामागील धबधब्यात पावसाळ्यात गेलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. हा धबधबा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जातो. सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे.

Five children were swept (PC - X/@ThePuneMirror)

Bhushi Dam Overflow: लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) च्या पाठीमागील धबधब्यात खेळताना एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. ही घटना दुपारी साडे बारा वाजता घडली असून, विविध पथकांमार्फत धरणाच्या पाण्यात बुडालेल्यांचा शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, भुशी धरणामागील धबधब्यात पावसाळ्यात गेलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. हा धबधबा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जातो. सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, 2 महिलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement