Laxman Kevate: MSRTC बसचे पहिले चालक लक्ष्मण केवटे यांचे निधन
Laxman Kevate Passed Away: राज्य परिवहन मार्ग मंडळाच्या पहिल्या एसटी बसचे आणि पहिल्या फेरीचे चालक असलेल्या लक्ष्मण केवटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 99 वर्षांचे होते. बुधवारी रात्री ८.४५ च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू आणि एसटी महामंडळाप्रती अपार सद्भावना ठेवणारे लक्ष्मण केवटे यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Laxman Kevate Passed Away: राज्य परिवहन मार्ग मंडळाच्या पहिल्या एसटी बसचे आणि पहिल्या फेरीचे चालक असलेल्या लक्ष्मण केवटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 99 वर्षांचे होते. बुधवारी रात्री ८.४५ च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू आणि एसटी महामंडळाप्रती अपार सद्भावना ठेवणारे लक्ष्मण केवटे यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अहमदनगर ते पुणे अशा धावलेल्या पहिल्या एसटीच्या फेरीचे ते चालक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परीवहन मंडळाने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पन केली आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)