First Mango Of The Season: मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये दाखल झाला यंदाच्या मोसमातला पहिला देवगड हापूस आंबा!
दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी हा आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या कातवण येथून पाठवला आहे.
मुंबईच्या वाशी मार्केट मध्ये यंदाच्या मोसमातला पहिला देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या कातवण येथून हा आंबा आला आहे. दरम्यान दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी हा आंबा पाठवला आहे. आंबा ही कोकणाची ओळख आणि फळांचा राजा असल्याने देशापरदेशात हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्ये वाट पाहत असतात.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)