Fire Breaks Out At KK Express: सोलापूर- दिल्ली के के एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किट मुळे भडकली आग; चालक जखमी, प्रवासी सुखरूप
रेल्वेमध्ये आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. दरम्यान चालक या दुर्घटनेमध्ये जखमी झाला आहे.
बुलढाण्यात काल (1 जुलै) बस पेटल्याचं वृत्त ताजं असताना आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं अजून एक वृत्त समोर आलं आहे. सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी सोलापूर जवळील मलिक पेठ येथे पावणे 9 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक भाजला आहे. तर प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. नक्की वाचा: Buldhana Accident: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement