FIR Against BJP MP Anil Bonde: राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल

आदल्या दिवशी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख आदींसह काँग्रेस नेत्यांनी बोंडे यांच्यावर कारवाईची मागणी करत अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. त्यानंतर, राजापेठ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.

Anil Bonde (PC - Facebook)

FIR Against BJP MP Anil Bonde: बुधवारी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याआधी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता भाजपचे राज्यसभा सदस्य आणि माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले की, राहुल गांधींची जीभ डागाळली पाहिजे कारण ते आरक्षणाबाबत जे बोलले ते धोकादायक आहे. बोंडे यांच्या वक्तव्यावर टीका करत विरोधकांनी गुरुवारी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोंडे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. मात्र, राहुल गांधींनी 'भारतविरोधी वक्तव्ये' करणे टाळावे आणि त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.

आदल्या दिवशी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख आदींसह काँग्रेस नेत्यांनी बोंडे यांच्यावर कारवाईची मागणी करत अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. त्यानंतर, राजापेठ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. (हेही वाचा: राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात; शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now