राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात; शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात; शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
संजय गायकवाड आणि राहुल गांधी Photo Credit- Facebook

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

संजय गायकवाड म्हणाले होते की, ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारची विधाने केली आहेत, त्यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी संविधान धोक्यात आहे, भाजप राज्यघटना बदलेल, असा खोटा प्रचार करून मते घेतली आणि आज अमेरिकेत बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले होते, ते संपवू असे ते म्हणाले. जो कोणी त्यांची जीभ कापेल त्याला मी 11 लाख रुपये देईन.’ मात्र गायकवाड यांच्या वक्तव्याचे भाजपने समर्थन केले नाही. (हेही वाचा: Sanjay Gaikwad On Rahul Gandhi: 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस'; संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान)

आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल-

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2024 10:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).