Fine on Mumbai Airport: मुंबई विमानतळाला ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रनवेवर रात्रीचे जेवण केल्याप्रकरणी BCAS आणि DGCA ची मोठी कारवाई

हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते.

Mumbai Airport (PC - Wikimedia commons)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (Directorate General of Civil Aviation- DGCA) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (MIAL) ला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) द्वारे 60 लाख रुपये दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे एकूण 90 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नुकतेच इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे. डीजीसीएने सांगितले की, या बाबत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर 17 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते आणि ते समाधानकारक आढळले नाही, म्हणून हा दंड ठोठावला गेला आहे. मुंबई विमानतळ 2007 च्या हवाई सुरक्षा परिपत्रक 04 मध्ये नमूद केलेल्या सुरक्षा आवश्यकतांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. (हेही वाचा: Aastha Special Trains: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर भारतीय रेल्वे चालवणार 200 आस्था स्पेशल ट्रेन; जाणून घ्या मार्ग आणि इतर तपशील)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)