Financial Grant: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 10 लाख आर्थिक अनुदान

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे.

Financial Grant: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 10 लाख आर्थिक अनुदान
CM Eknath Shinde | Photo Credit- X

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (हेही वाचा: German Language Training: वुटेनबर्ग येथे 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध; मुंबईत 15 केंद्रांवर दिले जाणार मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण, जाणून घ्या सविस्तर)

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 10:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).