Sindhudurg ST Bus Accident: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह ११ जण जखमी

महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 11 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बस विजापूरहून कुडाळच्या दिशेने जात होती.

ST bus Accident Photo Credit X

Sindhudurg ST Bus Accident: महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 11 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बस विजापूरहून कुडाळच्या दिशेने जात होती. दरम्यान, कुसूर-पिंपळगावजवळ वैभववाडीजवळ बसचा अपघात झाला. या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही. बस पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली अशी माहिती समोर आहे. अपघातानंतर प्रवशांमध्ये गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. एसटी बस अनिंयत्रित झाल्याने हा अपघात घडला.  (हेही वाचा- मुंबई-पुणे महामार्गावर एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात; महिलेचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now