Virar Accident: विरारमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन इमारतीचा भाग पडल्याने 3 मजुरांचा मृत्यू; 2 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, हा मोठा अपघात दुपारी घडला.

विरार येथे मंगळवारी एका बांधकामाधीन इमारतीचा मलबा अंगावर पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. विरार पूर्वेतील मनवेलपाडा रोड येथे सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर भिंत कोसमहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथे मंगळवारी एका बांधकामाधीन इमारतीचा मलबा अंगावर पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. विरार पूर्वेतील मनवेलपाडा रोड येथे सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोठा अपघात दुपारी घडला. भिंत कोसळल्याने पाच मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)