Bandra-Worli Sea Link: भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाने वांद्रे-वरळी सी-लिंकवर आपली लॅम्बोर्गिनी रेलिंगमध्ये घुसवली, गुन्हा दाखल
तक्षीलला त्याच्या उजव्या हाताला काही दुखापत झाली आहे, तर या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या लक्झरी कार लॅम्बोर्गिनी हुराकनचा वांद्रे-वरळी सी-लिंकवर अपघात झाला. मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा मुलगा तक्षशील सकाळी 7.30 च्या सुमारास वरळीच्या दिशेने जात असताना लक्झरी वाहनावरील ताबा सुटला आणि ते रेलिंगवर आदळले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. तक्षीलला त्याच्या उजव्या हाताला काही दुखापत झाली आहे, तर या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)