मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला Eknath Shinde यांचे उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
राज्यात सुरु असलेले राजकीय वादळ शमण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. अशात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत परत येण्याची साद घातली. ‘तुम्ही लोक परत आलात तर तोडगा निघू शकेल. पक्षाध्यक्ष आणि कुटुंबप्रमुख या नात्याने मला अजूनही तुमची काळजी आहे’, असे ते म्हणाले.
आता या आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ट्वीट करत ते म्हणतात, ‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? ‘
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement