Eknath Shinde Viral Video: माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमागील सत्य (Watch)
साधारण 30 सेकंदांची ही छोटी क्लिप आहे. ज्या वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्याने प्रश्न विचारला आहे की, एकनाथ शिंदे दारूच्या नशेत आहेत की काय?
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाव बरेच चर्चेत आहे. त्यांनी शिवसेनेशी केल्या बंडामुळे आज राज्यातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. सोशल मिडियावर त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले जात आहे. सध्या चालू असलेल्या राजकीय गदारोळामध्ये सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साधारण 30 सेकंदांची ही छोटी क्लिप आहे. ज्या वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्याने प्रश्न विचारला आहे की, एकनाथ शिंदे दारूच्या नशेत आहेत की काय? व्हिडिओमध्ये शिंदे हे मद्यधुंद अवस्थेत असल्यासारखे दिसत आहेत. त्यांच्याभोवती माध्यमांचा गराडा असून त्यांना नीट उभेही राहता येत नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
परंतु आता यामागचे सत्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी गोष्ट हे अर्धसत्य आहे. साधारण 2 मिनिटांच्या क्लिपमधील ही 30 सेकंदाची क्लिप आहे. माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी उसळेल्या गर्दीमुळे शिंदे यांना उभे राहता येत नसल्याचे 2 मिनिटांच्या क्लिपमध्ये दिसत आहे. त्यामुळे शिंदे हे दारूच्या नशेत नसून, गर्दीमुळे त्यांची ती अवस्था झाली आहे.
पहा दोन्ही क्लिप्स-