एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम; शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भावना, मनोगत किंवा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गुवाहाटी येथे सध्या एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्यासोबत बैठक सुरु आहे. अशात नुकतेच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भावना, मनोगत किंवा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्वीटमध्ये शिंदे यांनी एकूण 4 मुद्दे मांडले आहेत. या ट्वीटमध्येही त्यांनी पुन्हा हिंदुत्वाचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात-
- गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
- घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे- शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
- पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
- महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर अगदी काही वेळातच एकनाथ शिंदे यांचे हे ट्वीट आल्याने शिंदे आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement