एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीशीमध्ये जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जयंत पाटील यांना ही नोटीस IL&FS प्रकरणी देण्यात आली आहे. याच प्रकरणामध्ये पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील ईडी चौकशी झाली आहे. 12 मे दिवशी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. Money Laundering Case: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; दापोली रिसॉर्ट प्रकरणात ED ने सादर केलं आरोपपत्र.
पहा ट्वीट
Maharashtra | Enforcement Directorate summons NCP leader Jayant Patil tomorrow, 12th May , in connection with alleged IL&FS scam
(file photo) pic.twitter.com/Uq3PjIbmsR
— ANI (@ANI) May 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)