ED Raids MLA Ravindra Waikar's Residence: भुखंड घोटाळ्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांच्या निवास्थानी ईडीचे छापेमारी

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी आणि मुंबईतील इतर सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहे.

Ravindra Waikar PC ANI

ED Raids MLA Ravindra Waikar's Residence: शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी आणि मुंबईतील इतर सहा ठिकाणी ईडीने (Directorate General of Economic Enforcement) छापे टाकले आहे. भुखंड घोटाळ्याप्रकरणी  ईडीचे छापे सुरु आहेत. रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील बीएमसी खेळाचे मैदान आणि उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवून बीएमसीची 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रविंद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. वायकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)