Anil Jaisinghani Arrested: IPL मनी लाँड्रिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करणारा आरोपी अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

अनिल जयसिंघानी याला अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद युनिटने 10,000 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली.

Anil Jaisinghani (PC - Twitter)

Anil Jaisinghani Arrested: क्रिकेट बुकी आणि हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानी याला अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद युनिटने 10,000 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली. जयसिंघानी हा सट्टेबाज मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो 15 हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. तथापी, सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या खंडणी आणि लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्या “बेकायदेशीर” अटकेला आव्हान देणारी बुकी अनिल जयसिंघानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)