विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक दिवसीय परिषद आज मुंबई मध्ये पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीमध्ये राज्यातील सध्याची तीव्र उष्णता, पाणी, अवकाळी पाऊस, पावसाचा अंदाज, जलयुक्त शिवार अभियान यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार असून पंचनाम्याच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गारपीट, अवकाळी पावसासारख्या संकंटांनी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची मदतीची मर्यादा २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर पर्यंत वाढवली आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)