E-Cigarette Ban In University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाविद्यालय परिसरात बसणार ई-सिगारेटला आळा; विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश

मात्र, ऑनलाइन वेबसाइट आणि स्थानिक दुकानांवर ई-सिगारेट उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री करून विद्यार्थी व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात आहेत.

E-cigarettes | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

आजकाल पारंपारिक सिगारेटसोबतच अनेक तरुणांमध्ये ई-सिगारेट अधिक प्रसिद्ध झाली आहे. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयाच्या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. 2019 मध्ये यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन वेबसाइट आणि स्थानिक दुकानांवर ई-सिगारेट उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री करून विद्यार्थी व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. उच्च शिक्षण संचालनालयाच्या आदेशानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक काढून महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री व वापर होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Suicide Case: फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांची आत्महत्या, परिसरात आणि कॉलेजमध्ये हळहळ)