Dasara Melava 2022: आम्ही विचारांचे वारसदार! शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज
मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे.
Dasara Melava 2022: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आम्ही विचारांचे वारसदार, असं ब्रिदवाक्य यावर लिहण्यात आलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अद्याप धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं असणार? यावर निकाल दिलेला नाही. मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)