Dasara Melava 2022: आम्ही विचारांचे वारसदार! शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज

निवडणूक आयोगाने अद्याप धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं असणार? यावर निकाल दिलेला नाही. मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे.

Dasara Melava 2022: आम्ही विचारांचे वारसदार! शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज
Shinde group Dussehra Melava poster (PC - Twitter)

Dasara Melava 2022: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आम्ही विचारांचे वारसदार, असं ब्रिदवाक्य यावर लिहण्यात आलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अद्याप धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं असणार? यावर निकाल दिलेला नाही. मात्र, तरीदेखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2022 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).