'सरकारी पक्षाच्या माध्यमातून पोलीस दलाचा गैरवापर, विरोधक संपवण्याचे षडयंत्र'- Devendra Fadnavis यांचा आरोप

फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असल्याचा एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला.

devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

विशेष सरकारी वकील भाजप नेत्यांविरोधात कट रचत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'राज्य सरकारच्या विशेष सरकारी वकीलाने (एसपीपी) आमच्याविरुद्ध कट रचला आहे. माझ्याकडे याचे व्हिडिओ आहेत. याची चौकशी कोण करणार?' या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) करावा, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखले जात असल्याचा दावा करत, फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असल्याचा एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला.

यावेळी ते म्हणाले की, 'अलीकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सरकार षडयंत्र करत असेल तर त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही. आपला विरोधक संपवण्याचे षडयंत्र जर का सरकार करत असेल, तर या लोकशाहीचा उद्देश कधीच सफल होणार नाही.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now