Ajit Pawar Car Viral video: एकाच आसनावर चौघे स्वार! देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar Car Viral video

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, हे सर्वच नेते एकाच वाहनातून प्रवास करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे चालकाशेजारील पहिल्या आसनावर बसले आहेत. मात्र, पाठिमागच्या बाजूला या चारही नेत्यांमध्ये बसण्यासाठी खेचाखेची आणि ढकलाढकली सुरु आहे. खरे तर एकाच वाहनात बसण्यासाठी चालकाच्या पाठिमागे दोनच असने असतात. त्यात अॅडजेस्ट करुन कसातरी तिसरा व्यक्ती बसतो. मात्र, त्यातच जर चौथा व्यक्ती आला आणि तो जर थोडासा शरीराने मोठा असेल तर सर्वांचीच आवस्था पाहण्यासारखी होते. या व्हिडिओतही तसेच काहीसे दिसते.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ राज्यातील सत्ताधारी गटातील विद्यमान राजकीय परिस्थितीच दर्शवत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement