Devendra Fadanvis On Pankaja Munde: पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या, पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील - देवेंद्र फडणवीस
त्या कायम पक्षासोबत आहेत. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही जाणून घेऊ. पुढेही त्या पक्षात काम करत राहतील. त्याचबरोबर त्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे
मी 20 वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आमच्या सोबत आल्यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये ते स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ लागेल. याआधी आमच्या पक्षातील नेत्यांचा संघर्ष राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे ते स्वीकार करायला वेळ लागेल. या सर्व गोष्टींवर चर्चेतून मार्ग सुटू शकतो. पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या कायम पक्षासोबत आहेत. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही जाणून घेऊ. पुढेही त्या पक्षात काम करत राहतील. त्याचबरोबर त्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)