Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र

विधिमंडळात दाखल होताच आज नवाब मलिक सत्ताधार्‍यांसोबत बसले होते. यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते.

Mahayuti | Twitter

महाराष्ट्रात हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाची आज पासून सुरूवात झाली आहे. यामध्ये सध्या जामिनावर सुटलेले एनसीपी आमदार नवाब मलिक देखील सामील झाले. विधिमंडळात दाखल होताच आज ते सत्ताधार्‍यांसोबत बसले होते. यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते. या मध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजितपवारांना पत्र लिहून 'देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या आणि वैद्यकीय कारणावरून जामिन मिळालेल्या नवाब मलिकांना सत्तेत घेणं योग्य नाही. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.' असं म्हटलं आहे. हे पत्र सोशल मीडीयावर त्यांनी जाहीरपणे शेअर देखील केले आहे. Nawab Malik Joins Ajit Pawar's Group: शरद पवारांना मोठा धक्का! माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील .

पहा देवेंद्र फडणवीस यांचं पत्र 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement