Coal Scam: माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

विजय दर्डा हे कॉंग्रेसचे 3 टर्म राज्यसभा खासदार होते.

Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान विजय दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, M/S JLD यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  विजय दर्डा यांच्यासह सात जण या प्रकरणात दोषी ठरवले होते त्यानंतर आज या प्रकरणी शिक्षा सुनवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)