Davos World Economic Forum: अदानी समूहाचे संस्थापक Gautam Adani यांची महाराष्ट्र दालनात भेट; CM Eknath Shinde यांच्यासोबत केली गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.

Eknath Shinde and Gautam Adani

Davos World Economic Forum: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली. या सोबतच अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदानी यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. याआधी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे, यासाठी दावोस येथे चांगली संधी आहे. (हेही वाचा: Mumbai Marathon 2024: मुंबई मॅरेथॉनचा निधी उभारणीचा विक्रम, 267 स्वयंसेवी संस्थांनी जमवले 58 कोटी रुपये)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement