नृत्यांगना Gautami Patil हिच्या वडिलांचे निधन; धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते

गोतमीपर्यंत हा व्हायरल मेसेज पोहोचल्यानंतर तिने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. त्यानंतर माणुसकी म्हणून गौतमीने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते.

Gautami Patil | PC: Instagram

गौतमी पाटील ही गेल्या काही वर्षांत आपल्या लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. नुकतेच गौतमीचे वडील धुळ्यात बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे वृत्त समोर आले होते. आता माहिती मिळत आहे की गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. रवींद्र पाटील असे गौतमीच्या वडिलांचे नाव होते. माहितीनुसार, रवींद्र हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. त्यांना स्वराज्य फाऊंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते होते. खिशातील आधार कार्डवरून नाव समजल्यावर रवींद्र यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले गेले. हे फोटो समोर आल्यानंतर ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समजले.

गोतमीपर्यंत हा व्हायरल मेसेज पोहोचल्यानंतर तिने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. त्यानंतर माणुसकी म्हणून गौतमीने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. आता आज रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Mumbai Crime: मुंबईतील फ्लॅटमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह सापडला, क्लिनरला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now