Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सुरु असताना सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या भेटीवर विरोधकांचं टीकास्त्र

काल मुंबई उच्च न्यायालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी एकाच व्यासपिठावर हजेरी लावली होती. विरोधकांकडून या भेटीवर निशाणा साधण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सुरु असताना सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या भेटीवर विरोधकांचं टीकास्त्र

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Politics) लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे.  तारीख पे तारीखचं सत्र सध्या सर्वोच्च न्यायालयात बघायला मिळत आहे. तरी खरी शिवसेना (Shiv Sena) नेमकी कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची हा तिढा अजुनही कायम आहे. तरी काल मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत ( CJI Uday Lalit) यांनी एकाच व्यासपिठावर हजेरी लावली होती. तरी विरोधकांकडून यावर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि कॉंग्रस नेते सचिन सावंत यांनी सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या या भेटीबाबत आपत्ती व्यक्त केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2022 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).