Covid-19 on Cordelia Cruise: कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण 1,827 प्रवाशांपैकी 123 प्रवाशांना कोरोनाची लागण; 832 नमुन्यांच्या निकालाची प्रतीक्षा

कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण 1,827 प्रवाशांपैकी 123 प्रवाशांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली

Cordelia Cruise (Photo Credits: Facebook)

मुंबईहून गोव्याला गेलेल्या कॉर्डेलिया क्रूझवर 66 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर हे जहाज परत मुंबईला आले व इथे बीएमसीने सर्व प्रवाशांची चाचणी घ्यायला सुरुवात केली. आतापर्यंत, कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण 1,827 प्रवाशांपैकी 123 प्रवाशांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 832 नमुन्यांच्या चाचणी निकालाची प्रतीक्षा आहे. कॉर्डेलिया क्रूझमधील कोविड-19 पॉझिटिव्ह प्रवाशांना मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुडास कोविड केअर सेंटरमध्ये हलवले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement