Covid 19 New Variant: कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांचे होणार संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट
मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-19 चा नवा घातक व्हेरियंट सापडला आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट होणार आहे. अशा सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची तातडीने बैठक बोलावली. नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)