Covid-19: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविडसंदर्भात राज्यातील आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक; दिल्या महत्वाच्या सुचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन काही सूचना दिल्या. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील असेही ते म्हणाले, तसेच विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement