Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास आणि जबाब नोंदवण्याच्या नावाखाली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते.

Hasan Mushrif । Twitter/ANI

Money Laundering Case: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास आणि जबाब नोंदवण्याच्या नावाखाली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले मुश्रीफ हे मागील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री होते. (हेही वाचा - Fake News on Social Media: सोशल मीडियावरील फेक न्यूज ओळखण्यासाठी केंद्र सरकारने IT नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; न्यायालयाने केंद्राकडून मागितलं उत्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now