Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात, भाजपचे पारडे जड, पहा आकडेवारी

Sindhudurg District Bank | (Photo Credits: sindhudurgdcc.com)

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. आता या निकालाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. भाजप आणि मविआ सरकारच्या उमेदवारांनी आपली खाती उघडायला सुरूवात केली आहे. वैभववाडी गटातून भाजपचे दिलीप रावराणे यांचा विजय झाला आहे. तर सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झाले आहेत. तसेच देवगडमधून भाजपचे प्रकाश बोडस विजयी, वेंगुर्लेमध्ये भाजपचे मनीष दळवी विजयी झाल्याने भाजपचे पारडे जड होत चालले आहे. तर कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now