Zero Covid-19 Death in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या एकही रुग्णाचा मृत्यू नाही; सध्या शहरात 2301 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना विषाणू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना विषाणू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 235 रुग्णांची नोंद झाली असून, 446 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात 1032632 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 98% झाला आहे. सध्या शहरात 2301 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे आज शहरात एकाही कोरोना विषाणूचा रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बीएमसीने ही दिलासादायक माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement