काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते.

Vijay Wadettiwar | (Photo Credit: twitter)

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले. काँग्रेसने प्रदीर्घ खल केल्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वडेट्टीवार यांच्या रुपात राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement