Ravindra Dhangekar लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या भेटीला (Watch Video)

काही दिवसांपूर्वी मनसे मधून बाहेर पडलेले आणि पुण्यासाठी इच्छूक वसंत मोरे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.

Dhangekar | Twitter

महाविकास आघाडी मध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाने रविंद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. धंगेकर यांना काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पुण्यात NCP-SCP chief शरद पवार यांची भेट घेतली आहे. सध्या महाविकास आघाडीत काही जागांचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसल्याने सार्‍या उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकलेली नाही. कॉंग्रेस त्यांची यादी स्वतंत्र जाहीर करत आहे. राज्यभर सभांदरम्यान उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करत आहे. शरद पवारांकडून आतापर्यंत केवळ सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

शरद पवारांचे घेतले आशिर्वाद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)