Congress Announces Guarantees For Maharashtra: महिलांना 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार; महाराष्ट्रासाठी राहुल गांधींकडून काँग्रेसच्या मोठ्या घोषणा

नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी पाच हमीपत्रे जारी केली आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.

Congress logo (Photo Credits: X/@INCIndia)

Congress Announces Guarantees For Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप झाल्यानंतर आता निवडणूक आश्वासनेही दिली जाऊ लागली आहेत. नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी पाच हमीपत्रे जारी केली आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.

महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध केला. राहुल गांधी यांनी मंचावरून भाजप आणि शिंदे सरकारवर उघड निशाणा साधला. प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात, महिलांना दरमहा 3000 रुपये आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिला व मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन, जातीनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार, 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे, तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा 4000 रुपयांपर्यंतची मदत, अशा घोषणांचा समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेसाठी महाराष्ट्रात BJP कडून होणार जोरदार प्रचार; उद्या Amit Shah आणि Yogi Adityanath यांच्या सभांचे आयोजन)

Congress Announces Guarantees For Maharashtra:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now