केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना विषाणू लस घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये लसीचा तुटवडा आहे. अशात जस जसा लसीचा पुरवठा होईल तस तसे 18 वर्षांपेक्षा जास्त व्यक्तींचे लसीकरण होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जून-जुलैमध्ये राज्याकडे जास्त प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध असतील असेही त्यांनी सांगितले. लसीकरण केंद्रांवर जास्त गर्दी करू नका असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद - LIVE https://t.co/inljVFPtdA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)