CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow': अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले, पहा व्हिडीओ (Watch)
देवेंद्र फडणवीस बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले. सुमारे साडेपाच वर्षांच्या अंतरानंतर फडणवीस पुन्हा त्याच ठिकाणी राहणार आहेत, जे 2014 ते 2019 या काळात त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. म
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी, देवेंद्र फडणवीस बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले. सुमारे साडेपाच वर्षांच्या अंतरानंतर फडणवीस पुन्हा त्याच ठिकाणी राहणार आहेत, जे 2014 ते 2019 या काळात त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 80 तास चालल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये वर्षा बंगला रिकामा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, फडणवीस 'सागर' येथे गेले आणि तेथे ते उपमुख्यमंत्रीही म्हणून राहिले. पुढे 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही ते आतापर्यंत 'सागर' येथेच राहत होते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बुधवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एक छोटी पूजा करण्यात आली. पूजेनंतर वर्षा येथे ‘गृहप्रवेश’ करण्यात आला. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 मृतांना राज्य सरकार कडून मदतीचा हात; 50 लाखांची मदत,शिक्षण आणि नोकरी देखील देणार)
CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow'-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)