महाराष्ट्र राज्य यंदा 1 मे दिवशी 63 वा महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रवासियांची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची  बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण व्हावी यासाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठी जनता, राज्य सरकार केंद्राकडे यासाठी विविध स्तरातून मागणी करत आहे. भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. Marathi Bhasha Din 2023: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ लवकरच PM Narendra Modi यांची भेट घेणार; CM Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)