Kolkata Local Train Video: कोलकाता येथे लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये हाणामारी, पाहा व्हिडिओ
भांडणाचे कारण स्पष्ट नसले तरी या महिलांना भांडण करताना पाहणे अत्यंत भयावहआहे उपस्थित काही लोकांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये होणारी महिलांची हाणामारी ही काही नवी नाही. पण अशा प्रकारची हाणामारी केवळ मुंबई लोकलमध्येच होते असे नाही इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लोकल ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये एक गट एकमेकांशी भांडतो आहे. व्हिडिओत महिलांना ओरडताना, एकमेकांना चप्पलने मारताना आणि एकमेकांनी ठोसे मारताना आपण पाहू आणि ऐकू शकता. भांडणाचे कारण स्पष्ट नसले तरी या महिलांना भांडण करताना पाहणे अत्यंत भयावहआहे उपस्थित काही लोकांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. व्हिडिओच्या शेवटी, भांडणात सहभागी असलेल्यांपैकी एक महिला तिच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मुलावर वस्तू फेकताना दिसत आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ @Ayushihihaha ने ट्विटरवर शेअर केला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)