Chitra Wagh On Gulabrao Patil: महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत, त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत - चित्रा वाघ
गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केलं ?? ही नौटंकी चालणार नाही. महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत, आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत.
नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना नेते, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य केलं आणि त्याची नंतर सर्वत्र चर्चा झाली. दरम्यान त्यांनी यावर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. पण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या सगळ्यावर टीका केली आहे. गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केलं ?? ही नौटंकी चालणार नाही. महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत, आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)