बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत, म्हणाले- आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीतही केली होती चर्चा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही 7 डिसेंबर रोजी एक पत्र लिहून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याची विनंती केली होती.
मुंबई: बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्वागत केले आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्याच वेळी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही 7 डिसेंबर रोजी एक पत्र लिहून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याची विनंती केली होती. याशिवाय 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण केल्याने विषाणूचा प्रसार रोखण्यास नक्कीच मदत होईल आणि लक्षणात्मक आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोसचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Tweet