Central Railway Update: आसनगाव स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकात ओव्हर हेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या दुरूस्तीचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.
आसनगाव स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या कसारा कडे जाणार्या गाड्या वाशिंद स्टेशन मधूनच मागे घेतल्या जात आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हा बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वे अपडेट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)