केंद्रीय एजन्सी करत आहेत आपल्या अधिकारांचा गैरवापर; नेते Sanjay Raut यांनी PMO कडे सादर केले पुरावे

ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याआधी एक पत्रकार परिषद घेत राज्यातील 5 भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. आता त्यांनी कसे केंद्रीय एजन्सी काही लोकांविरुद्ध आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत, याबाबतचे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केले आहेत. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली. काही अधिकारी 'वसुली एजंट' मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंग करत असल्यासंबंधी हे पुरावे आहेत. याबाबत आपण पत्रकार परिषद घेऊन अधिक तपशील शेअर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)