Buldhana Accident: बुलढाण्यातील बस अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Buldhana Bus Accident

समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचे समोरील टायर फुटल्याने बस अनियंत्रत होऊन उलटली. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता, की बसमधील प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. या अपघातानंतर पंतप्रधान कार्यालयाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली असून जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement